सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण; वकिलांच्या संपामुळे सुनावणी पुढे ढकलली

803

सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी दिल्लीतील रोझ अव्हेन्यू न्यायालयाने पुढे ढकलली आहे. वकिलांच्या संपामुळे या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या प्रकरणात आरोपी असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी नुकतेच न्यायालयात अर्ज करून परदेशी प्रवास करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना ओमान, यूएई आणि अमेरिकेच्या प्रवासाला जायचे होते. मात्र सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने त्यांना आता न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी शशी थरूर यांच्या विरोधात हत्येचा खटला दाखल करण्याबाबत न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी सांगितले की, शशी थरूर यांचे याआधी दोन वेळा लग्न झाले असून, सुनंदा या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिवा मेनन यांनी एसडीएमला सांगितलं आहे की, ‘सुनंदा पुष्कर यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्या आत्महत्या करण्याचा कधीही विचार करणाऱ्यातील नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली यावर विश्वासत बसत नाही.’

17 जानेवारी 2014 मध्ये दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी आत्महत्येच्या संशयासोबत त्यांची हत्या झाल्याच्या संशयानेही तापास केला होता. पुष्कर यांची हत्या शशी थरूर यांनी केल्याचा संशय व्यक्त होत होता. पोलिसांनीही आरोपपत्रात शशी थरूर यांचा आरोपीमध्ये समावेश केला होता.  शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार सोबत थरुर यांचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप  पुष्कर यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या