सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर 15 ठिकाणी जखमा , पोलिसांची न्यायालयात माहिती

991

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर झटापटीमुळे जखमा झाल्याच्या खुणा असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. दिल्ली पोलिसांचे वकिल अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात ही माहिती दिली असून याप्रकरणी थरूर यांच्याविरोधात कलम 498अ व कलम 306 अंतर्गत आरोपपत्र दाखल केल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात पीडित व्यक्तीचा मानसिक तसेच शारीरिक छळ झालेला आहे. त्यांच्या शरिरावर 15 ठिकाणी झटापट केल्यामुळे झालेल्या जखमा आहे. त्यांच्यासोबत शारीरिक हिंसा झाली असल्याचे स्पष्ट होते, असे श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितले.

17 जानेवारी 2014 मध्ये दिल्ली येथील हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या मृत्युचा संशय त्यांचे पती शशी थरूर यांच्यावर होता. मृत्यूच्या आधी सुनंदा यांनी शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार सोबत अफेयर असल्याचा आरोप केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या