
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. आज त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला.
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्या- नंतर अर्थखाते वगळता अजित पवारांकडे असलेली क्रीडा आणि उत्पादन शुल्क ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. आता राजकीयदृष्ट्या प्रभावी मानला जाणारा पुणे जिल्हा आणि बीड हा मराठवाडय़ातील महत्त्वाचा जिल्हा यांची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होते. दरम्यान, अजितदादांकडील नियोजन आणि वित्त हे खाते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवले आहे.
































































