
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये गेल्या दोन वर्षांपासून ‘कार्यभार व्यवस्थापन’ (वर्कलोड मॅनेजमेंट) या संकल्पनेचा खूपच लोड झालाय. मात्र ही संकल्पना संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी अडथळा ठरतेय. त्यामुळे आगामी वर्षात ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ हा प्रकार हिंदुस्थानी क्रिकेटच्या शब्दकोषातून कायमचा डिलीट केला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत हिंदुस्थानचे माजी कर्णधार, दिग्गज फलंदाज आणि ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
गावसकर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात खेळाडूंच्या विश्रांतीचा निर्णय खेळाच्या गरजेपेक्षा बाहेरूनच अधिक घेतला जातोय. खेळाडू जर स्वतःला तंदुरुस्त मानत असेल तर त्याला खेळू द्यावे. वारंवार विश्रांती देण्यामुळे संघातील संतुलन ढासळतेय आणि खेळाडूंमध्ये सातत्याचा अभावही दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.