
सिंधुदुर्ग जिह्याचे सुपुत्र आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बुधवारी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील श्री नवदुर्गा माता मंदिर येथे सपत्नीक दर्शन घेतले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी आपल्या पुलदेवतेसमोर नतमस्तक होत भक्तीभाव व्यक्त केला. यावेळी यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांनीही आपल्या पुटुंबीयांसह उपस्थिती लावली. गावसकर आणि विश्वनाथ पुटुंबियांनी मनोभावे देवीची पूजा केली व विधिवत दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी मंदिराच्या महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. आपल्या भावना व्यक्त करताना सुनील गावसकर म्हणाले की, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा आपण आपल्या पुलदेवतेच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होत असतो. यामुळे त्यांना विशेष ऊर्जा मिळते. गावसकर यांनी रेडी येथे भेट दिली त्यावेळी क्रिकेटप्रेमी आणि स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
 
             
		



































 
     
    





















