
लाडकी बहीण या महिलांच्या योजनेत पुरुषांनी डल्ला कसा काय मारला? याबाबत राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढून उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. आज विधानसभेत बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.
सुनील प्रभू म्हणाले आहेत की, “लाडकी बहीण योजनेत शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने १४,९९८ पुरुषांनी दरमहा 1500 प्रमाणे दहा महिने लाभ घेतला. त्यांच्यावर काय कारवाई झाली? लाडकी बहीण या महिलांच्या योजनेत पुरुषांनी डल्ला कसा काय मारला? या योजनेत १४,९९८ पुरुषांची नावे कोणी घुसवली?”
ते म्हणाले, शासनाने त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही? ८००० बोगस लाभार्थी कोण आहेत? यात एकूण बोस लाभार्त्यांची संख्या २६ लाख इतकी असून ५ लाख १३६ कोटी ३० लाख रुपये जे पुरुषांना गेले आहेत. त्यांना गेलेली रक्कम सरकार परत घेणार का? झालेल्या घोटाळ्याविषयी सरकार श्वेत पत्रिका काढून जनतेला माहिती देणार आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

























































