मुलांची अदलाबदल; न्यायालयात याचिका

छत्तीसगडमधील एका खासगी रुग्णालयात ‘मुलांची अदलाबदल’ होत असल्याचा आरोप करणाऱ्या एका जोडप्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे आणि या प्रकरणावर विचार करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने 1 सप्टेंबर रोजी छत्तीसगड सरकार आणि रायपूरमधील रुग्णालयाच्या संचालकांसह इतरांना नोटीस बजावली आणि याचिकेवर चार आठवड्यात उत्तर मागितले.