ज्ञानवापी मशीद प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा मुस्लीम पक्षकारांना धक्का, सर्वेक्षण सुरू ठेवण्याला परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मुस्लीम पक्षाकारांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे. कुठल्याही प्रकारचे खोदकाम न करता हे सर्वेक्षण करावे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी भारतीय पुरातत्व विभागाकडून (एएसआय) ज्ञानवापी मशिदीच्या शास्त्रीय सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. शुक्रवारी सकाळी एएसआयचे पथक ज्ञानवापी मशिदी परिसरामध्ये पोहोचले. या पथकासोबत आयआयटी कानपूरचे तीन तज्ज्ञही होते.

नेमके काय आहे प्रकरण…

 ज्ञानवापी मशीद परिसरात पूजाअर्जा करू देण्याची विनंती वाराणसीतील काही साधूंनी 1991मध्ये न्यायालयाकडे केली होती. हिंदू मंदिराचा काही भाग उद्ध्वस्त करून ही मशीद बांधण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

 अलीकडेच पार हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशीद संकुलात श्रंगारगौरीसह अन्य देवतांच्या पूजनासाठी परवानगी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने या संकुलाच्या तळमजल्यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरणासाठी समिती नेमली. या सर्वेक्षणाला मशीद व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतला.

 तिथे सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला, तर तो वजुखान्याचा भाग असल्याचा मुस्लिम याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मात्र शिवलिंग परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करून कालमापन करण्याची आवश्यकता हिंदू याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे.