लालूपुत्र तेजस्वीला न्यायालयाचा दणका, 50 हजारांच्या दंडासह सरकारी बंगला सोडण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहार विधानभेचे विरोधी पक्षनेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादव यांना बंगला वादावर सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. न्यायालयने तेजस्वी यादव यांची याचिका फेटाळून लावली असून त्यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर तेजस्वी यादवने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.


उपमुख्यमंत्री पदावरून हटल्यानंतर तेजस्वी यादव यांना 5 देशरत्न मार्गावरील सरकारी बंगला सोडण्याचे आदेश दिले होते. तेजस्वी यादवने यावर याचिका दाखल करून राज्य सरकारला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने राज्य सरकाच्या पक्षात आदेश दिला होता.

तेजस्वी यादव हे पाटण्यातील 5 देशरत्न मार्गावर उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यात राहत होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना हा बंगला मिळाला होता. नुकतंच बिहार सरकरने त्यांना हा बंगला मोकळा करण्यास सांगितले होते. तर दुसरीकडे सध्याचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी पोलो मार्गावरील एका बंगल्यात वास्तव्यास आहे. हा बंगला राज्याच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यासाठी राखीव आहे.