सर्वोच्च न्यायालयाने अवमानप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्ल्याची फेरविचार याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने अवमाननाप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्ल्या याने दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नसल्याने न्यायालयाने 2017 मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबाबत मल्ल्याला न्यायालयाने दोषी ठरवले होते. या आदेशाचा फेरविचार करण्याची याचिका मल्ल्याने दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत मल्ल्याने त्याच्या मुलाच्या बँक खात्यात चार कोटी अमेरिकी डॉलर जमा केले होते. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याने न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याला 2017 मध्ये दोषी ठरवले होते. या आदेशाचा फेरविचार करण्याची याचिका त्याने दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बँकांचे कर्ज बूजवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत.