परदेशी गुन्हेगारांसाठी धोरण हवे

फसवणूक प्रकरणातील एक परदेशी नागरिक जामीन रद्द करून फरार आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने परदेशी नागरिक न्यायापासून पळून जाऊ नयेत याची खात्री करण्यासाठी धोरणाची आवश्यकता अधोरेखित केली. नायजेरियाच्या अ‍ॅलेक्स डेव्हिडला झारखंड उच्च न्यायालयाने मे 2022 जामीन दिला होता. हा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला होता. तसेच नायजेरिया नागरिकाच्या प्रत्यार्पणाबाबत कोणताही द्विपक्षीय करार नसल्याचे सांगण्यात आले.