दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी जाणाऱयांपेक्षा रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे होणाऱया अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या अधिक असते असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने खड्डय़ांमुळे होणाऱया रस्ते अपघातांबद्दल आज तीव्र चिंता व्यक्त केली.

देशातील रस्त्यांवरील सुरक्षिततेशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुरू होती. त्यावेळी रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे होणाऱया अपघाताचाही प्रश्न ऐरणीवर आला. त्यावेळी रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी असलेल्या एका समितीला या प्रश्नात गंभीरपणे लक्ष घालून दोन आठवडय़ांत अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

– रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे निर्माण झालेली परिस्थिती भयावह आहे. माणसांच्या जीवनमरणाशी निगडित तो प्रश्न बनला आहे, असे मत खंडपीठाने यावेळी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाला चिंता
रस्त्यांवरील अपघातांमध्ये लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अपघात घडून जीव गमवावा लागलेल्या नागरिकांना भरपाई दिली गेली पाहिजे. त्यांचा तो अधिकारच आहे – सर्वोच्च न्यायालय