
आखातात सुरू असलेल्या युद्ध आणि जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी यामुळे देशासमोर सध्या मोठे आर्थिक आणि ऊर्जा संकट उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या सुरक्षेसाठी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त आणि दिलेली सरकारी वाहने तातडीने काढून घेण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दुपारी एक्सवर पोस्ट शेअर करत ताफा काढून घेण्याची मागणई केली. सध्याच्या परिस्थितीत इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करणे ही काळाची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. देशावरील हे आर्थिक आणि ऊर्जा संकट दूर झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानंतर अगदीच गरज भासल्यास सुरक्षेचा पुन्हा विचार करावा; मात्र सद्यस्थितीत माझी सुरक्षा आणि गाड्या त्वरित हटवण्यात याव्यात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
काय आहे एक्स पोस्ट?
सध्या भारतासमोर भीषण आर्थिक तसेच उर्जासंकट उभा राहिले आहे. परिणामी इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझे शासनाला नम्र आवाहन आहे की, कृपया आपण माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबत दिलेली वाहने तातडीने काढून घ्यावी. देशावरील उर्जा आणि आर्थिक संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेंव्हा अगदीच गरज भासल्यास ती पुन्हा बहाल करण्याचा विचार करावा. परंतु सद्यस्थितीत आपण कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त आणि गाड्या काढून घ्याव्या, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सध्या भारतासमोर भीषण आर्थिक तसेच उर्जासंकट उभा राहिले आहे. परिणामी इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझे शासनाला नम्र आवाहन आहे की, कृपया आपण माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबत दिलेली वाहने तातडीने काढून घ्यावी.…
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2026


























































