सिंचन घोटाळय़ाची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा आणि एका कथित बँक घोटाळ्याची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने बोलतात. माझी त्यांना एक विनंती आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा आणि एका बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी आपण विनंती करीत आहोत, असे सुळे संसदेत बोलताना म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यासह 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. मोदींच्या या आरोपानंतर एका आठवडय़ाच्या आत अजित पवार हे राष्ट्रवादीतून एक वेगळा गट करून शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले होते.