
पक्षफुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवाद होत नसला तरी आज जाहीर कार्यक्रमात सुळे यांच्या प्रश्नावर पवार यांनी खुलासे करत उत्तरे दिली. वारजे येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी रखडलेल्या महापालिका निवडणुका लवकर व्हाव्यात अशी मागणी केली. त्यावर खुलासा करताना अजित पवार म्हणाले, सर्वेच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या आहेत. तसेच, वारजे येथील हॉस्पिटल भूमिपूजनाचे श्रेयवादाच्या फलकावरूनही अजित पवार यांनी त्यांच्या व मित्र पक्षातील माजी नगरसेवकांना टोला लगावला.
वारजे येथे महापालिकेच्या साडेतीन एकर जागेवर डीबीएओटी तत्वावर उभारण्यात येत असलेल्या 375 खाटांचे मल्टीस्पेशालिटी आणि हिलींग हॉस्पिटलचे भूमिपूजन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी ही शाब्दिक चढाओढ बघायला मिळाली.
nकार्यक्रमासाठी सर्वजण स्टेजवर पोहोचले असताना अचानक फडणवीस यांचा फोन वाजला आणि फडणवीस हे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापासून काहीसे दूर जाऊन कोपऱयात फोनवर बोलू लागले. त्या वेळी उपस्थितांच्या भूवया उंचावल्या. त्यामुळे फडणवीस यांना नेमका कोणाचा कॉल आला असावा, अशी चर्चा रंगली होती.
पक्ष बदलणे म्हणजे ज्या आईने वाढवले तिलाच विसरण्यासारखे!
अनेक लोक पक्ष बदलतात. पक्ष बदलणे म्हणजे ज्या आईने वाढवले, लहानाचे मोठे केले. त्या आईलाच विसरण्यासारखे आहे, असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे-पाटील यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, ज्यांचा हेतू चांगला नाही ते लोक या परिसरात येऊन मनभेद निर्माण करीत आहेत. अशा लोकांना थारा देऊ नका, असे आवाहनही थोरात यांनी केले.





























































