रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य सुपरस्टार शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांच्यावर शुक्रवारी सकाळी चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात कार्टोइड आर्टरी रिवास्कुलरायजेशन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दरम्यान, रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाने शुक्रवारी मेडिकल बुलेटीन जारी करत देण्यात आली आहे.