…तर नेतृत्वासाठी गिल, पंड्यामध्ये शर्यत

येत्या 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईत होणाऱ्या आशिया कपमध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध, 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध आणि 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध होणार रंगणार आहे, मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फिटनेसवर अजूनही अनिश्चितता कायम आहे. सध्या तो फिट होण्यासाठी मेहनत घेतोय, पण त्याच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व कोण सांभाळणार, याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी शुभमन गिलसह हार्दिक पंडय़ा आणि अक्षर पटेल यांची नावे समोर आली आहेत. हिंदुस्थानच्या नेतृत्वासाठी तिघेही फिट मानले जात आहेत, मात्र सूर्याबद्दल जोपर्यंत काही निश्चित होत नाही तोपर्यंत तिघांची नावे वेटिंग लिस्टमध्येच असतील.

सूर्याने फिटनेसला प्राधान्य दिले असून तो जोरदार तयारी करताना नुकतेच काही पह्टो समोर आले. त्यामुळे तो फिट होईल, असा विश्वास आहे. मात्र आशिया कप ही एक महत्त्वाची स्पर्धा असल्यामुळे बीसीसीआय नेतृत्वाबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. गिलने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानचे नेतृत्व केले होते. त्यामुळे तो शर्यतीत पुढे आहे.