सुशांतच्या डिलीट ट्विटस्चा शोध घेणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे काही ट्विटस्ही गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आता त्याच्या या गायब ट्विटस्चा शोध घेणार आहेत.

सुशांतसिंहने आत्महत्या करण्यापूर्वी काही ट्विट डिलीट केल्याचे सांगण्यात येते. त्या ट्विटस्मध्ये त्याने नेमके काय लिहिले होते किंवा त्याला नेमके काय म्हणायचे होते या ट्विटस्मध्ये कुणावर आरोप तर केले नव्हते ना? किंवा या ट्विटस्मधून आत्महत्येचे संकेत तर दिले नव्हते ना? या सर्व प्रश्नांचा शोध घेण्यासाठी पोलीस या ट्विटस्चा तपास करणार आहे. त्यासाठी ट्विटर इंडियाशी पोलीस संपर्क साधणार आहेत. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांची चौकशी केली आहे. काल त्याच्या चार्टर्ड अकाऊंटस्ची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतचा पोस्टमार्टेम अहवाल आला असून त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची नखेही साफ असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.