सुशांतसिंहची हत्या की आत्महत्या? सीबीआयच्या निर्णयाकडे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांतसिंह राजपुत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस प्रोफेशनली करीत होते. मात्र अचानक हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत जनता प्रश्न विचारत आहे. यावर सीबीआयच्या तपासातून नेमाका काय निकाल येतोय. याकडे आम्ही उत्सुकतेने लक्ष ठेवून आहोत, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला.

सुशांतच्या कुटुंबाचीही चौकशी

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या कुटुंबाचीही चौकशी करण्याचे संकेत सीबीआयने दिले आहेत. सुशांतची बहिण मीतू व प्रियंका या दोघींची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. आता प्रियंका व तिच्या पतीला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. अमली पदार्थ प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबाविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येणार आहे.