सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, करण जोहरच्या मॅनेजरला समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी करण जोहरच्या मॅनेजरला चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. 27 जुलै रोजी करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी होणार असून गरज पडल्यास करण जोहरलादेखील चौकशीसाठी बोलविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनादेखील समन्स बजावण्यात आले असून त्यांचीही चौकशी होणार आहे.

सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर अनेकांनी करण जोहर याच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलविल्याने सर्वांच्या नजरा या चौकशीकडे लागून राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना रणौत हिने सुशांतच्या आत्महत्येनंतर आदित्य चोप्रा, करण जोहर आणि मेहश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळेच पोलिसांनी आता करण जोहर याच्या मॅनेजरला चौकशीासठी बोलविल्याचे कळते. कंगना हिने सुशांत हा बॉलीवूडच्या गटबाजीचा शिकार झाला होता, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या सर्व बाबींचा पोलीस तपास करीत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.