लालूप्रसाद यादव यांनी मला मारण्यासाठी काळी जादू केली होती, सुशील मोदींचा गंभीर आरोप

बिहार मधील निवडणूका अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. 28 ऑक्टोबरला बिहार निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार असून येत्या महिन्याभरात बिहार वर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. संपूर्ण बिहारमध्ये सध्या प्रचाराची धाम धूम सुरू असून नेत्यांमध्ये

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत

त्यातच बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लालूप्रसाद यादव मला मारण्या साठी तीन वर्षांपूर्वी माझ्यावर काळी जादू केली होती असा गंभीर आरोप सुशील मोदी यांनी केला आहे

सुशील मोदी म्हणाले ‘राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव हे तंत्र मंत्र करतात, पशुबळी देता त. इतकं सगळं करूनही तुरुंगात जाण्यापासून ते स्वतःला वाचवु शकले नाहीत. प्रेत साधना देखील त्यांनी केली आहे तरीही ते तुरुंगात गेले.

यंदा लालूप्रसाद यादव नवमीच्या दिवशी 3 बकऱ्यांचा बळी देणार आहेत. कारण त्यांना कळून चुकले की काही पक्षांसोबत केलेली युती त्यांना विजय मिळवून देऊ शकत नाही. लालूप्रसाद यादव अंधश्रद्धाळू आहेत. त्यांनी एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून सफेद कुर्ता घालणं सोडलं. तांत्रिक शंकर चरण त्रिपाठी याला त्यांनी पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता बनवले. त्याच तांत्रिकाने मिर्झापूर मध्ये लालूप्रसाद यादव यांच्याकडून तांत्रिक पूजा करून घेतली होती. तसेच तीन वर्षापूर्वी मला मारून टाकण्यासाठी देखील त्यांनी काळी जादू केली होती’

सुशील कुमार मोदी यांच्या या गंभीर आरोपांवर लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तसेच बिहार मधील महागठबंधन चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी पलटवार केला आहे. ”सुशील कुमार मोदी यांचे वक्तव्य भयंकर आहे त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती. त्यांनी रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य या विषयांवर बोलले पाहिजे त्यांनी गेल्या पंधरा वर्षात काय प्रगती केली ते सांगितलं पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत अशी वक्तव्य करणं भयंकर आहे.” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे. तसेच त्यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे

आपली प्रतिक्रिया द्या