आता यापुढे निवडणूक लढवणार नाही – सुशील कुमार शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोलापूर

माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे स्पष्ट केले आहे. यापुढे एकही निवडणूक लढवणार नाही असेही शिंदे म्हणाले. शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपसह वंचित बहुजन आघाडीवरही निशाणा साधला.

सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. 2014 ला लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून ते पराभूत झाले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भारतीय जनता पक्षाचे जयसिद्धेश्वर महाराज निवडणूक लढवत आहेत.