आयुष्यभर मी याच दिवसाची वाट पाहत होते, सुषमा स्वराज यांचे अखेरचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविणे ही हे भाजपच्या अनेक नेत्यांचे महत्त्वाचे ध्येय होते. त्यातील एक होत्या सुषमा स्वराज. स्वराज यांनी देखील जम्मू कश्मीरमधून 370 हटविण्यासाठी लढा दिला आहे. भाजपने जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविण्याचे विधेयक आणलं. मंगळवारी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सायंकाळी 7.30 च्या दरम्यान स्वराज यांनी ट्विट करत मोदी सरकारचे अभिनंदन केले. त्या ट्विटमध्ये त्यांनी मनला चटका लावेल असे वक्तव्य केले आहे. ‘मी आयुष्यभर याच दिवसाची वाट पाहत होते’, असे ट्विट त्यांनी केले. या ट्विटनंतर अवघ्या दीड तासानंतर त्यांना हृद्यविकाराचा झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले.