
ब्रिटनमध्ये एका शीख महिलेवर वर्णभेदाची टिप्पणी करून तिच्यावर दोन ब्रिटिश तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सध्या कसून चौकशी करत आहे. ब्रिटनमध्ये वर्णभेद आणि स्त्री-पुरूष द्वेषाला अजिबात थारा नाही, असे खासदार प्रीत कौर गिल यांनी म्हटले.


























































