
#MahaElection कुडाळ तालुक्यातील कालेली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरूवारी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश स्वाभिमानला धक्का मानला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत कालेली गावातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी प्रवेशकर्त्यांनी केला.
कुडाळ शिवसेना शाखेत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. आमदार वैभव नाईक यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधले. कालेली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे बुथ अध्यक्ष उमेश बाळकृष्ण परब, मन्ना म्हाडेश्वर, विकास वास्कर, दिप्ती शेडगे, संतोष शेडगे, बळीराम सावंत, उमेश विष्णू परब, धपंजय परब, दामिनी परब, कैलास परब, रूपेश परब आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांवर प्रेरीत होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत असून या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भक्कम साथ देऊ असे या प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितले. कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती श्रेया परब, संजय भोगटे, संतोष शिरसाट, माजी जि.प.सदस्य तथा ग्राहक संरक्षण कक्ष कुडाळ तालुका प्रमुख रमाकांत ताम्हाणेकर, महिला आघाडी तालुका संघटक मथुरा राऊळ, विभागप्रमुख रामा धुरी, कृष्णा धुरी, सुधीर राऊळ, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हाडगूत, संदीप म्हाडेश्वर, साईश घुर्ये, राजू गवंडे, ज्ञानेश्वर आळवे, अनंत पाटकर, ग्रा.पं.सदस्य आरोही चव्हाण, संगिता कालेलकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


































































