
व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी आता सरकारने संवाद हे स्वतःचे मेसेजिंग अॅप विकसित केले आहे. या अॅपने नुकतीच सिक्युरिटी चाचणी पास केली आहे. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स’ने या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच केले जाऊ शकते. टेस्ट पास झाल्याची माहिती डीआरडीओने आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे. केवळ ठराविक कंपनीच्या कर्मचाऱयांना याचा अॅक्सेस मिळणार आहे, अशी माहिती आहे.

























































