
आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषकाची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये होत आहे. बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करत असून प्रत्येक देशाने आपला संघही जाहीर केला आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ फेव्हरेट असून जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर सर्वांची नजर आहे. बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक आहे, मात्र बुहराहहून घातक असलेल्या एका गोलंदाजाला वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळाल्याने त्याने क्रिकेटलाच रामराम केला.
टी-20 वर्ल्डकपसाठी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या संघाची घोषणा झाली. या संघात यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा याची निवड झाली नाही. यानंतर मलिंगा याने तात्काळ क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. मलिंगा टी-20 फॉर्मेटमधील खरतनाक गोलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये मलिंगाने 107 बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये मलिंगाच्याच नावावर सर्वाधिक 170 बळींची नोंद आहे. वर्ल्डकपच्या संघात मलिंगाची निवड न झाल्याने क्रीडाप्रेमी हैरान झाले होते. मलिंगानेही तात्काळ निवृत्ती घेतल्याने श्रीलंकेच्या संघाला या सर्वोत्तम गोलंदाजाची कमी नक्कीच जाणवेल.
लसिथ मलिंगा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपपासून 2016 पर्यंत झालेल्या प्रत्येक वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या संघाकडून खेळला होता. क्रिकेटच्या या महासंग्रामात त्याने 31 लढती खेळल्या आणि 7.43 च्या दमदार इकोनॉमीच्या मदतीने 38 बळी घेतले आहेत. वर्ल्डकपमध्ये 31 धावा देऊन 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 2007 ला त्याने सलग चार चेंडूवर चार बळी घेण्याचीही नोंद केली होती.
T20WC विराट नाही तर ‘या’ खेळाडूपासून सर्वाधिक धोका, पाकिस्तानी खेळाडूनेच दिली कबुली
2014 मध्ये झालेला टी-20 वर्ल्डकप श्रीलंकेने जिंकला होता. या संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा होता. मलिंगाने आपला अखेरचा टी-20 सामना 2020 मध्ये खेळला होता. यानंतर तो आयपीएलमध्येही खेळला नाही आणि लंका प्रीमिअर लीगमध्येही तो मैदानात उतरला नाही. तत्पूर्वी त्याने कसोटी आणि एक दिवसीय संघातूनही निवृत्ती घेतली होती.
तेव्हा मॉर्गनने वर्ल्डकप उंचावण्यास नकार द्यायला हवा होता, सेहवागचा इंग्लंडच्या कर्णधाराला टोला
पर्सनल लाईफ
मलिंगा याने तानियासोबत लग्न केले आणि दोघांच्या लग्नाचीही एक स्टोरी आहे. हिक्कदुवामधील एका हॉटेलमध्ये जाहिरातीचे शूटिंग सुरू असताना मलिंगा आणि तानियाची भेट झाली होती. तानिया तेथील मॅनेजर होती. पहिल्याच नजरेत दोघांनी एकमेकांना पसंद केले. दुसऱ्या भेटीत एकमेकांना नंबर शेअर केले आणि ही लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली. 22 जानेवारी, 2010 मध्ये दोघांनी लग्न केले.





























































