T20 WC न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव, टीम इंडियाची वाट बिकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर टी-20 सामना रंगला. हिंदुस्थानने विजयासाठी दिलेले 111 धावांचे माफक आव्हान न्यूझीलंडने 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 33 चेंडू राखून पूर्ण केले. न्यूझीलंडकडून डॅरील मिशेल याने सर्वाधिक 49 धावा केल्या, तर कर्णधार केन विलियम्सन याने नाबाद 33 धावांचे योगदान दिले.

हिंदुस्थानच्या संघाला पहिल्या लढतीतही पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने विराटच्या संघाचा 10 विकेट्सने पराभव केला होता. आता न्यूझीलंडनेही 8 विकेट्सने पराभव केला आहे. या पराभवामुळे हिंदुस्थानची पुढील वाट बिकट झाली आहे.

T20 WC अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, रडत-रडत सांगितलं कारण

हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 110 धावा केल्या. हिंदुस्थानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारे फलंदाज वर्ल्डकपमध्ये मात्र पुरते ढेपाळल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक 26 धावांची खेळी रविंद्र जाडेजा याने केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ड याने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर सोढीने दोन बळी घेतले. टीम साउथी आणि मिल्नेला प्रत्येकी एक बळी मिळाला.

हिंदुस्थानचा संघ आज दोन बदलांसह मैदानात उतरला. सूर्यकुमार यादव याच्या ऐवजी ईशान किशनला संघात स्थान मिळाले, तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूर याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र हे दोघेही आपली छाप उमटवू शकले नाहीत.