मी स्वतःसाठी नाही, तर देशासाठी धावा करतो – ईशान किशन  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत काल (दि. 9) झालेल्या दुसऱया  सामन्यात हिंदुस्थानचा डावखुरा फलंदाज ईशान किशन याने 93 धावांची धडाकेबाज खेळी केली. अवघ्या सात धावांनी त्याला पहिल्या शतकाने हुलकावणी दिली. मात्र, शतक हुकले असले तरी देशाच्या विजयासाठी 93 धावांचे योगदान देता आले याचा मला जास्त आनंद आहे. मी हिंदुस्थानसाठी खेळतोय आणि जर मी माझ्या धावांचा विचार करत असेन तर ती माझ्या चाहत्यांशी प्रतारणा होईल, अशा शब्दांत ईशान किशनने हुकलेल्या शतकावर आपली प्रतिक्रिया देत सर्वांची मने जिंकली.