T20 World Cup 2024 : फायनलमध्ये कोण भिडणार? ब्रायन लाराने टीम इंडियाचं नाव घेत केलं मोठं भाकित

टी20 वर्ल्ड कपसाठी आयोजक अमेरिका आणि वेस्ट इंडिजसह सर्व देश सज्ज झाले आहेत. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. 2 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणता संघा फायनलमध्ये धडक मारणार? यावरून क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू तसेच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या सर्व घडामोडींवर वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याने मोठे वक्तव्ये केले आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 20 संघ विजेतेपद पटकवण्यासाठी आपापसात भिडणार आहेत. सर्व संघांची पहिल्यांदा साखळी फेरीत लढत होईल. त्यानंतर सुपर-8 चा थरार रंगणार आहे. युवा खेळाडूंचा भडिमार असणारी रोहित शर्माची टीम इंडिया वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडिया उंपात्य फेरीत सहज पोहचेल, असे भाकित अनेक दिग्गज खेळाडूंनी वर्तवले आहे. ब्रायन लारानेही तसेच भाकित केले आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल होईल, असे लाराने म्हटले आहे.

ब्रायन लारा याने स्टार स्पोर्ट्सला आपली प्रतिक्रिया दिली. “टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये खेळला जाईल”, असे ब्रायन लारा म्हणाला. टीम इंडियाने 2007 मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. पण त्यानंतर टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.