
ICC T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तानचा खेळ निरशाजनक राहिला. हिंदुस्थानविरुद्द खेळण्यावरूच वर्ल्ड कपपूर्वी PCB ने बराच हंगामा केला. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर बरीच टीका झाली. सुपर 8 मध्ये पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. टी20 वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात आला आहे. याच दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूने हॉटेलमधील महिला स्टाफसोबत गैरवर्तन केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळवण्यात आले. पाकिस्तानचा संघ श्रीलंकेमधील ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याच हॉटेलमधील एका महिला स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पाकिस्तानी खेळाडूवर लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणी संबंधित खेळाडूवर कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान संघाचे संघ व्यवस्थापनक नवीद चीमा यांनी याप्रकरणी खेळाडूवर कारवाई केली आहे. तसेच हॉटेल व्यवस्थापनाची माफी सुद्धा मागीतली आहे.
सदर घटना श्रीलंकेतील कँडी येथील गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये घडली आहे. पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्ड कप दरम्यान गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये थांबला होता. या हॉटेलमध्ये एका पाकिस्तानी खेळाडूने महिला हाउसकिपींग स्टाफसोबत गैरवर्तन केले. या दरम्यान महिलेने मोठ्याने आरडाओरडा करत मदत मागितील्याचे वृत्त आहे. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी सदर खेळाडूची तक्रार संघ व्यवस्थापक नवीन चीमा यांना केली होती. त्यानंतर खेळाडूवार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तो खेळाडू नेमका कोण होता? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

























































