यंदाही रंगणार आरंभचा ‘तालसंग्राम 2019’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, डोंबिवली

‘आरंभ प्रतिष्ठान’ हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली अनेक वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर आता राज्याच्या सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या सांस्कृतिक नगरित आपण गतवर्षीप्रमाणेच 26 व 27 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 ते रात्री 9.55 या वेळेत ‘तालसंग्राम 2019’ ही राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धा, सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात घेत आहोत.

यंदा या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन करवीराधीपती छत्रपती संभाजीराजे आवर्जून उपस्थित राहणार असून 27 जानेवारी रोजी ते संध्याकाळी 7.30 नंतर स्पर्धास्थळी येणार आहेत, हे सांगायला आम्हाला विशेष आनंद होत आहे. त्या स्पधेर्साठी डोंबिवली, पुणे, चिपळुण, रत्नागिरी, औरंगाबाद, फलटण, उरण, कल्याण, भिवंडी आदी ठिकाणांमधून 16 पथके सहभागी होत आहेत.

या स्पर्धेत विजयी होणाऱ्या पथकांसाठी प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख 50 हजार, द्वितीय पारितोषिक रुपये 1 लाख, तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे पारितोषिक असेल. तसेच उत्कृष्ट ढोल, ताशा, टोल, ध्वजधारीं यांसाठीही प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक, तसेच सहभागींसाठीही विशेष तरतूद करण्याचा संस्थेचा मानस आहे. विजेत्या पथकांना आकर्षक ट्रॉफी तसेच सन्मानपत्र, सहभागींना देखील सहभाग प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.