तापसी पन्नू अडकणार लग्नबंधनात, या खेळाडूसोबत बांधणार लग्नगाठ

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा ट्रेंड सुरू आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री गेल्या काही महिन्यामध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. याच यादीत आता प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूनेही आपला नंबर लावला आहे. तापसी देखील लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मार्चच्या अखेरीस तापसी तिचा बॉयफ्रेंड मथियास बो याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

तापसी गेल्या 10 वर्षांपासून हिंदुस्थानी बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक मॅथियास बो याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तापसी आणि मथियास यांचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे. या लग्नात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न शीख आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माच्या रितीरिवाजांनुसार होणार आहे. मात्र, या दोघांनाही अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mathias Boe (@mathias.boe)

तापसीने मॅथियाससोबत असलेले आपले नाते कधीही लपवून ठेवले नाही. ती नेहमीच आपल्या प्रियकरासोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसली. सोशल मीडियावर दोघेही सक्रीय असतात. दोघांनी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तापसीचा प्रियकर मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. तसेच 2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले.

तापसी पन्नूने अनेक हिंदी तसेच तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच तिने शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता तापसी अर्शद सय्यद दिग्दर्शित ‘वो लड़की है कहाँ’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे.