Photo- इंडो वेस्टर्न साडीमध्ये तापसीचा किलर लूक; लग्नानंतर पहिल्यांदाच शेअर केले खास फोटो

बॉलीवूड अभिनेत्री Taapsee Pannu सध्या चर्चेत आहेत ते तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे. काही दिवसांपूर्वीच तापसी तिच्या बॉयफ्रेंड Mathias Boe याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. तापसीने लग्नानंतर पहिल्यांदाच तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तापसी पन्नू इंडो वेस्टर्न लुकमध्ये कहर करताना दिसत आहे. तापसीने अनोख्या स्टाईलमध्ये साडी परिधान केली आहे. सोबतच तिने फ्लेयर्ड पँटसह काळा लांब कोट परिधान केला आहे. फोटोंमध्ये तिच्या बोटात अंगठी दिसत आहे. या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला आशा आहे की साडीसोबतचा हा रोमान्स कधीच संपणार नाही. तापसीच्या फोटोंवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. कमेंटमध्ये अनेकांनी तिचे लग्नाचे फोटो शेअर करण्याची मागणी केली आहे.