‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री घेणार घटस्फोट

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री सिंपल कौल पती राहुल लुंबाला घटस्फोट देणार आहे. हे दोघेही सहमतीने विभक्त होत आहेत. सिंपल कौलने नुकताच घटस्फोटासाठी कोर्टात अर्जदेखील दाखल केला आहे. सिंपलने ‘तारक मेहता…’ या मालिकेत जेठालालची पहिली पत्नी गुलाबोची भूमिका साकारली होती.