तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

केंद्र सरकारच्या वतीने 2023 या वर्षाचा जाहीर झालेला ‘पद्मविभूषण’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आज त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. केंद्र सरकारच्या वतीने राज्याच्या अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांनी हा पुरस्कार प्रदान केला. मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘माझ्या कलेच्या माध्यमातून केलेल्या सेवेची दखल घेतली, मी कृतज्ञ आहे,’ असे मनोगत यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांनी व्यक्त केले. ‘आपल्यासारख्या जागतिक कीर्तीच्या कलावंतांचा सन्मान करण्याचा हा क्षण आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे,’ अशी भावना यावेळी सुजाता सौनिक यांनी व्यक्त केली.