‘हे’ आहेत बेस्ट बजेट Tablets, 15 हजाराहून कमी किंमतीत मिळणार ‘4G’ आणि ‘Wi-Fi’ सपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठ्या स्क्रीनसोबतच स्लिम आणि लाइटवेट डिझाइनमुळे ‘टॅबलेट’ सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. टॅबलेट तुम्ही स्मार्टफोनप्रमाणे तुमच्यासोबत नेहमी कुठेही घेऊन जाऊ शकता. याची मोठी स्क्रीन, मोठा आवाज आणि इतर अनेक फीचर्समुळे, कमी किंमतीत या टॅब्लेटवर कोणतेही काम करणे खूप सोपे होऊन जाते. ऑफिस किंवा व्यवसायाचे प्रेझेन्टेशन, ऑनलाइन मीटिंग्ज, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी हा डिव्हाइस अत्यंत उपयुक्त ठरतो. जर तुम्हीही कमी किंमतीत बेस्ट फीचर्स असलेला टॅबलेट खरेदी करू इच्छिता, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला हिंदुस्थानात उपलब्ध 15 हजाराहून कमी किंमत असलेल्या टॅबलेट बद्दल माहिती सांगणार आहोत.

Samsung Galaxy Tab A7 Lite

Samsung हा टॅबलेट अत्यंत आकर्षक आणि प्रीमियम दिसतो. यात 1340 X 800 पिक्सेल रिझोल्यूशनसह 8.7 इंच HD स्क्रीन देण्यात आली आहे. कमी किमतीच्या या टॅब्लेटमध्ये स्लिम बेझल आणि स्क्रीन ते बॉडी रेशो 80% आहे. ज्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट विव्हींग अनुभव मिळेल. यात 32GB स्टोरेज देण्यात आले आहे, जे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. यासोबतच यात 3GB रॅम आणि 5100mAh ची ऑल डे बॅटरी देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवर याची ऑनलाईन किंमत 11,999 रुपये इतकी आहे.

Lenovo Tab M8

Lenovo Tab M8 मध्ये 8-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, 13MP रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात MediaTek Helio प्रोसेसर आहे, जो 2.3GHz पर्यंत हाय स्पीड प्रदान करतो. ऑनलाइन वर्गांबरोबरच, ई-पुस्तके वाचणे, यूट्यूब किंवा कोणत्याही अॅपद्वारे ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी हा टॅबलेट उत्तम आहे. अ‍ॅमेझॉनवर याची ऑनलाईन किंमत 13,911 रुपये इतकी आहे.

Pebble Quad Pro 1 GB RAM 16 GB ROM 7 inch with Wi-Fi+4G Tablet

हा अतिशय परवडणारा टॅबलेट आहे. यात 7 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा Wi-Fi आणि 4G सिमला देखील सपोर्ट करतो, त्यामुळे तुम्ही वाय-फाय झोनच्या बाहेर कुठेही कनेक्ट राहू शकता. कमी किमतीच्या या टॅबलेटमध्ये 1GB RAM आणि 16GB स्टोरेज देण्यात आले आहे. ई-पुस्तके वाचण्यासाठी, गेमिंगसाठी, चित्रपट पाहण्यासाठी किंवा ब्राउझिंगसाठी हा एक उत्तम टॅबलेट आहे. यात 2MP रियर कॅमेरा आणि 2MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची ऑनलाईन किंमत 6,506 रुपये इतकी आहे.