
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 9 जूनपासून पाच टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीतील तापमानाचा विचार केल्यास तेथील वातावरणामध्ये प्रचंड उष्णता आहे. अगदी रात्रीचे तापमानदेखील 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. याचा अर्थ पाहुण्या खेळाडूंना राजधानीतील उष्णतेशी जुळवून घेताना कसरत करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने एक मिश्कील ट्विट करून दिल्लीतील हवामानाचे अपडेट्स दिले आहेत.



























































