
सामना ऑनलाईन, मुंबई
ताडदेव कोळी महोत्सव 2018 या कार्यक्रमाचे नुकतेच विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाचे आयोजन सिंधुदुर्ग-कोल्हापूर संपर्पप्रमुख अरुण दुधवडकर, मलबार हिल संघटक अरविंद बने, स्थापत्य समिती अध्यक्षा अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर, शाखा संघटिका सुप्रिया शेंडेकर, मुंबई नियोजन समिती सदस्य हरीश धारिया यांनी केले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला विभाग संघटक जयश्री बलीकर, उपविभागप्रमुख सुजीत राणे, उपविभाग संघटक सुरेखा उबाळे, समन्वयक लता पाटील, शाखाप्रमुख संतोष सकपाळ आणि युवासेना संघटक किसन सावंत आदी उपस्थित होते.



























































