#World Cancer Day ‘तो’ बॅकलेस फोटो होतोय व्हायरल, ताहिराची भावूक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अभिनेता आयुष्मान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप हिने गेल्या वर्षी आपल्याला कॅन्सर असल्याचे सांगितले होते. आता जागतिक कॅन्सर दिनानिमित्त तिने आपला एक बॅकलेस फोटो सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. या फोटोसोबत ताहिराने एक भावूक पोस्टही लिहिली असून हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ताहिराने बॅकलेस फोटो शेअर केला असून यात कॅन्सरला दिलेल्या लढाईचे व्रणही दिसत आहेत. ज्या कॅन्सरचे नाव ऐकूण अनेक जण थरथर कापतात तो कॅन्सर माझा असल्याचे ताहिराने म्हटले आहे. फोटोसोबत ताहिराने लिहिले की, ‘आज जागतिक कॅन्सर दिवस आहे, म्हणजे माझा दिवस आहे. तुम्हा सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा. अपेक्षा करते की तुन्हा हा दिवस अशा पद्धतीने साजरा करतील की कॅन्सप्रती लोकांच्या मनात असलेली भिती नष्ट होईल.’

‘मी माझ्या भितीला मिठी मारली असून हे माझ्या सन्मानार्थच आहे. हा फोटो मी यासाठी शेअऱ केला आहे की जे लोकं या आजाराशी लढत आहे त्यांना लढण्याची शक्ती मिळेल. किती तरी वेळा असे होते की आपण जीवनात मागे जातो, परंतु आपण एक पाऊल किंवा अर्धे पाऊल उचलून पुढे जाण्याचा नेहमीच प्रयत्न करायला हवा’, असे ताहिराने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

ताहिरासह नुकतीच कॅन्सरला मात देऊन परतलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने देखील एक पोस्ट शेअऱ केली आहे. यात तिने म्हटले की, ‘कोणाला वाटते हे खरे होईल. सी शब्द ऐकूण प्रत्येकाला भिती वाटते. याच्यासाठी एक खास दिवस असणे का आवश्यक आहे. मी देखील याचा खूप घाबरले होते. परंतु लवकरच मला समजले की याला घाबरून नाही तर याचा सामना करून आपण जिंकू शकतो.’