पॉर्न साइटवर शिकवतो गणित; वर्षाची कमाई आहे दोन कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांना समजेल आणि विषय निरस होणार नाही, अशा पद्धतीने शिकवण्याकडे शिक्षकांचा कल असतो. तसेच त्या विषयात विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी आणि विषयात त्यांनी स्वतःहून प्राविण्य मिळवावे, यासाठीही शिक्षक प्रयत्न करतात. गणित हा तसा अनेकांना अवघड वाटणारा आणि नावडता विषय. या विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी तैवानमधील गणिताच्या शिक्षकाने अनोखा मार्ग चोखाळला आहे.

या शिक्षकाने आपले गणिताचे व्हिडीओ चक्क पॉर्न साइटवर अपलोड केले आहेत. आतापर्यंत या शिक्षकाने 200 पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत. चांगसू नावाच्या या शिक्षकाकडे गणिताची मास्टर्स डिग्री आहे. तो 15 वर्षांपासून तैवानमधील विविध शाळांमध्ये आणि ऑनलाईन क्लासद्वारे गणित शिकवण्याचे काम करतो. ऑनलाईन क्लाससाठी त्यांनी आधी यूट्यूबचा वापर केला. मात्र, गेल्यावर्षी त्यांनी धाडसी निर्णय घेत गणिताचे आपले व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड करण्याचा निर्णय घेतला.

यूट्यूबवर फक्त विद्यार्थीच आपले गणिताचे व्हिडीओ बघत होते. मात्र, जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांच्यात गणिताची गोडी निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी हा मार्ग निवडल्याचे त्यांनी सांगितले. पॉर्न व्हिडीओ बघण्यासाठी सर्व वयोगटातील लोक येतात. कुतुहलाने ते गणिताचे व्हिडीओही बघतात. त्यामुळे त्यांच्यात गणिताची गोडी निर्माण होत असल्याचे चांगसू यांनी सांगितले.

माझे व्हिडीओ आवडलेले अनेकजण आपला पाठ्यक्रम विकत घेत आहेत. या पाठ्यक्रमाच्या विक्रीतून चांगसू यांनी वर्षाला
7,500,000 न्यू तैवान डॉलर ( सुमारे 2 कोटी रुपये) मिळतात. या व्हिडीओतून त्यांची महिन्याची कमाई 15 लाखांपर्यंत जाते. या अनोख्या निर्णयाने चांगसू यांची चर्चा असून ते वर्षाला दोन कोटींची कमाई करत आहेत. पॉर्न साईटवर गणित शिकवण्याचा आपला हेतू नाही. फक्त लोकांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी हा मार्ग चोखाळल्याचे त्यांनी सांगितले.