
‘टकाटक’च्या यशानंतर ‘टकाटक-2’ या नावानं या चित्रपटाचा सिक्वेल येतोय. नुकतेच यशस्वीरीत्या या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. ‘टकाटक-2’च्या टीमनं गोव्यात मुहूर्तानंतर लगेच तिथलं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर दुसऱयाच दिवशी गोव्यात शूटिंगवर बंदी घातली होती. त्यानंतर राज्यातील निर्बंधामुळे शूटिंग रखडले होते.
अखेर निर्बंध शिथील होताच चित्रपटाच्या टीमने बारामती आणि भोरमध्ये शूटिंग करण्याची योजना आखली. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत नुकतंच चित्रपटाचे शूटिंग यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी दिली आहे. टकाटक-2मध्ये प्रथमेश परब सोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू आदींच्या भूमिका आहेत.























































