गुजरातमध्ये हिल स्टेशनवर सेल्फी काढणे आता गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील हिल स्टेशन असणाऱ्या सापुतारा येथे आता सेल्फी काढणे महागात पडणार आहे. कारण हिल स्टेशन परिसरात सेल्फी काढणे हा एकप्रकारे गुन्हा असणार आहे. वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना लक्षात घेतल्यानंतर आता हा निर्णय लागू करण्यात आला आहे. दक्षिण गुजरातच्या डांग येथे असलेले सापुतारा हे पर्यटकांमध्ये एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. सापुतारा हिल स्टेशन आणि धबधबा बघायला विशेषतः पावसाळ्यात येथे मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने पुन्हा येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. डांग जिह्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सूचना काढली आहे. सूचनेनुसार हिल स्टेशन परिसरात सेल्फी काढण्यावर आणि पह्टोग्राफी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.