
सामना ऑनलाईन । काबूल
दक्षिणेकडील हेलमंड प्रांतातील लष्करी छावणीवर हल्ला चढवून या आठवड्याच्या अखेरीस तालिबानी दहशतवाद्यांनी 33 अफगाणी सैनिक आणि 7 पोलीस कर्मचारी ठार केल्याचे अफगाणिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
प्रांतीय परिषदेचे प्रमुख अताउल्ला अफगाण यांनी सोमवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा हल्ला सांगीन जिह्यात शुक्रवारी रात्री झाला. यात 31 सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी तालिबानी दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. अफगाण लष्कराचे प्रवक्ते नवाब शाह यांनी सांगितले की, दहशतवाद्यांमध्ये सापडलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी सरकारी विमानांनी धाव घेतली होती.

























































