चिकन शॉरमा खाल्ल्याने मुलीचा मृत्यू

असंख्य मांसाहारी लोकांना कोंबडीचे मांस अर्थात चिकन खाणं आवडतं.भरपूर प्रथिने, काही जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्याने ते आरोग्यासाठीही चांगले असल्याचे मानले जाते. मात्र हेच चिकन खाणं तुमचा जीव घेणारे ठरू शकते.  कच्चे आणि कमी शिजलेले चिकन खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता आणि यामुळे तुमचा मृत्यूही होण्याची शक्यता असतेयअसंच एक प्रकरण तामिळनाडूमध्ये घडले आहे.

तामिळनाडूतील नमक्कल येथे चिकन शॉरमा खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा होऊन एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.रविवारी तिच्या वडिलांनी हॉटेलमधून मांसाहारी पदार्थ आणले होते. त्यात चिकन शॉरमाचाही समावेश होता.तरुणीने शॉरमा खाल्याने तिची तब्येत बिघडली होती आणि त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. काहीतरी खाल्याने तिला विषबाधा झाली होती असे डॉक्टरांनी या मुलीचा कुटुंबियांना सांगितले होते. यावर या मुलीने चिकन शॉरमा खाल्ला होता असे तिच्या घरच्यांनी डॉक्टरांना सांगितले होते. यामुलीवर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले, मात्र घरी आल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रेस्टॉरंटमधील चिकन शॉरमामुळे या मुलीचा मृत्यू झाला त्याच रेस्टॉरंटमधील मांसाहारी पदार्थ मेडीकलचे 13 विद्यार्थी आजारी पडले होते. या सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या  हॉटेलवर छापा टाकला असून तेथील तीन जाणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ग्रील्ड चिकन, तंदुरी चिकन किंवा शॉरमा यांसारखे मांसाहारी पदार्थांचे नमुने गोळा करून हे पदार्थ कोठून आणले होते याचा शोध अन्न सुरक्षा पथक घेत आहे.