चिमणीचं घरटं वाचवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, तामीळनाडूतील शेतकऱयावर होतोय काwतुकाचा वर्षाव

वाढते शहरीकरण आणि औद्योगिक विकास यामुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे चिमण्या वाचवण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. एका चिमणीचं घरट वाचवण्यासाठी तामीळनाडूतील एका शेतकऱयाने केलेल्या अनोख्या जुगाडाची सध्या नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी ‘रिअल हिरो’ म्हणत या शेतकऱयाचे काwतुक केले आहे.

जे. रंगनाथन असे या 40 वर्षीय शेतकऱयाचे नाव आहे. तो तामिळनाडूच्या पुंभकोणमजवळील तंजावूर या गावामध्ये राहतो. रंगनाथन यांच्या शेतातील पिकांचे 120 दिवसांचे चक्र पूर्ण झाले होते. पिकांच्या कापणीसाठी ते तयार होते. शेतामध्ये कापणी सुरु असताना त्यांना एक चिमणीचे घरटे दिसले. त्यांनी ताबडतोब कापणी मशीन चालवणाऱयाला थांबायला सांगितले आणि घरटे तपासले. या घरटय़ात त्यांना चिमणीची चार अंडी दिसली. त्यानंतर चिमणीला आणि तिच्या घरटय़ाला नुकसान पोहचू नये यासाठी रंगनाथन यांनी आपल्या शेतातील काही भागातली कापणी सोडून दिली. यासोबत त्यांनी घरटय़ाला काही नुकसान पोहचू नये यासाठी पिकाला चारही बाजूने काठय़ा बांधल्या. घरटं आणि अंडी दोन्ही सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करुन घेतली. चिमण्या वाचवण्यासाठी शेतकऱयाने केलेल्या या प्रयत्नाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या