अखेर तापसीने मौन सोडले; एकापाठोपाठ एक ट्विट करत मांडली बाजू

3 मार्च रोजी आयकर विभागाने केलेल्या कारवाईविषयी अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विटरवर आपली बाजू मांडली आहे. आयकर विभागाने तापसी आणि निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर 350 कोटींची हेराफेरी झाल्याची माहिती दिली आहे. शिवाय तापसीच्या नावावर पाच कोटींच्या रोख रकमेची पावती मिळाल्याचेदेखील म्हटले आहे. या सर्व प्रकारावर तापसीने शनिवारी मौन सोडले.

तापसीने याप्रकरणी लागोपाठ तीन ट्विट केले आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, तीन दिवसांच्या चौकशीनंतर मुख्यत्वे तीन गोष्टी समोर आल्या. पॅरिसमध्ये माझ्या मालकीच्या ज्या कथित बंगल्याची किल्ली माझ्याकडे असल्याचे बोलले जात आहे तेथे मी आजपर्यंत कधीच गेले नाही. पाच कोटींची पावती मिळाल्याच्या आरोपावर तापसीने दुसरे ट्विट केले आहे. पाच कोटींची कोणतीही पावती माझ्याकडे नाही. मी हे पैसे घेतलेले नाहीत असे तापसीने म्हटले आहे. तिसऱ्या पोस्टमध्ये तिने 2013 ला आयकर विभागाने माझ्या घरावर धाड टाकली नव्हती असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या