
कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी ही वृद्धा गेली 5 वर्षे पडक्या घरात एकटीच राहत आहे. आपल्याला घर बांधून मिळावे यासाठी तिने अनेकदा संबंधित यंत्रणेकडे मागणी केली. मात्र, शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे ती अद्याप वंचितच राहिली. येत्या पावसाळ्यात तिला राहण्यासाठी सुरक्षित निवारा नव्हता. ही बाब लक्षात घेऊन कासार्डे ग्रामस्थ आणि कासार्डेतील विविध संघटनांनी वृद्धेला जीवनावश्यक वस्तू जसे तांदूळ, बटाटे, डाळ असे महिनाभर पुरेल अशा वस्तू कासार्डे ग्रामविकास मंडळाच्या वतीने अध्यक्ष गुरु पाताडे, विजय पाताडे, गणेश पाताडे, अनंत नकाशे यांनी दिल्या. यावेळी कासार्डे गावचे सरपंच बाळासाहेब तानवडे, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, विद्याधर नकाशे, संजय नकाशे, गणेश पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते.


























































