
स्टारलिंकची सॅटेलाईट हायस्पीड इंटरनेट सेवा आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. यामुळे दुर्गम आणि खेडय़ापाडय़ात इंटरनेट सुविधेचा लाभ लोकांना घेता येणार आहे. यासाठी उद्योजक इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत राज्य सरकारच्या माहिती- तंत्रज्ञान विभागाने सामंजस्य करार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. स्टारलिंकसोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. माहिती-तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यावेळी उपस्थित होते.
n स्टारलिंक ही जगातील सर्वाधिक प्रगत लो-अर्थ ऑर्बिट उपग्रह संस्था आहे, जी विश्वासार्ह आणि उच्च-गतीचा ब्रॉडबँड इंटरनेट पुरवते. हे नेटवर्प स्पेसएक्स या कंपनीद्वारे विकसित व संचालित केले जाते.
प्रायोगिक टप्प्यातील मुख्य उद्दिष्टे
n शासन व आदिवासी शाळा, आपले सरकार पेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य पेंद्रांना उपग्रह इंटरनेट जोडणी प्रदान करणे
n आपत्ती प्रतिसाद आणि किनारी सुरक्षा व्यवस्थेतील संवाद सुधारणा.
n शिक्षण व आरोग्य सेवेसाठी उच्च-गती इंटरनेटद्वारे सुविधा उपलब्ध करून देणे
n राज्य यंत्रणा आणि स्थानिक समुदायांसाठी प्रशिक्षण व क्षमता-विकास कार्यक्रम राबविणे.



























































