इचलकरंजीच्या होडी शर्यतीत तरुण मराठा बोट क्लबची बाजी

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेल्या होडय़ांच्या शर्यतीत हजारो लोकांच्या उपस्थितीत सांगली जिह्यातील सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब ‘अ’ यांनी सलग तिसऱ्या वर्षी पहिला नंबर मिळवून चांदीची फिरती गदा मिळवली. दुसरा क्रमांक डिग्रज बोट क्लब, तिसरा कवठेसार युवा शक़्ती बोट क्लब, तर चौथा क्रमांक जय मल्हार बोट क्लब डिग्रज यांनी पटकावला.

आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण, तर शर्यतीचा शुभारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रथम क्रमांकाची फिरती चांदीची गदा मध्यवर्ती हातमाग सहकारी विणकर संघाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर अधीक्षक अण्णासो जाधव, विक्रांत गायकवाड, श्रीरंग खवरे, पै. अमृत भोसले, बाळासाहेब कलागते उपस्थित होते.